आज काहीतरी लिहूया....

 

 

 

 


 

         आज काहीतरी लिहूया….. पण काय लिहावे? कुणाबद्दल किंवा कशाबद्दल लिहावे? स्वतःबद्दल लिहावे कि दुसऱ्या बद्दल लिहावे?

  स्वतःबद्दल लिहावे....... पण खरंच स्वतःबद्दल लिहिता येऊ शकतं काय? मग स्वतःबद्दलच लिहायचं की स्वतःला आलेल्या अनुभवाबद्दल लिहायचं? पण मग पुन्हा तोच प्रश्न ....... आपण स्वतःबद्दल लिहिताना किंवा स्वतःला आलेल्या अनुभवाबद्दल लिहिताना प्रामाणिक असतो काय? कारण आपण लिहिलेलं हे कुणीतरी वाचणार हे नक्की. कुणीतरी म्हणजे कुणीही...... अगदी आपण स्वतः . कारण  आपण लिहिलेलं जर आपणच काही वेळानंतर किंवा भविष्यात कधीतरी वाचणार असलो तरी आत्ता, या घडीला भविष्यातील आपण असलेलो वाचक हा कुणीतरी त्रयस्थच आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य स्वतःबद्दल लिहिताना याचा विचार करणारच. प्रामाणिकपणाचा कस हा इथे लागतो. म्हणून स्वतःबद्दल लिहिताना एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला एका विशिष्ठ प्रकारे स्वतःबद्दल लिहिलेलं समजावं हा दृष्टिकोन कायम जोपासावा लागणार. म्हणजे एका प्रकारे स्वतःबद्दल लिहिताना किंवा स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहिताना ते दुसऱ्यांच्या दृष्टिकोनानुसार लिहावे लागणार...... अगदी १००% प्रामाणिकपणा अंमलात आणला तरीही.....

   मग अशा प्रकारे स्वतःबद्दल लिहिताना वाचकांचा विचार करावा लागत असेल तर ते लिखाण हे तद्दन स्वतःबद्दलचे कसे असू शकेल? ...... त्यामुळेच की काय मला आत्मचरित्र हा प्रकार कधी कधी नाटकी वाटतो.... आणि त्यातल्या त्यात प्रामाणिक असणारे लोक हे आपलं आत्मचरित्र हे आपल्या मृत्यूनंतर प्रकाशित करत असतील......

    ठीक आहे ..... आपण दुसऱ्याबद्दल लिहू. पण पुन्हा तोच प्रश्न.. खरंच दुसऱ्याबद्दल लिहिता येऊ शकतं काय? कारण इतरांबद्दल लिहिताना त्या व्यक्तीसंदर्भात असणारी आपली मतं , आपला पूर्वग्रह किंवा त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवांचे विश्लेषण हे आपण आपल्या विचारांवर आधारित असेल किंवा आपली संकल्पनेवर आधारित असेल या पद्धतीने करतो. जिच्याबद्दल आपण लिहिणार आहोत त्या व्यक्तीचे आचरण,वार्तालाप,कार्यपद्धती,संवाद,तिचा जीवनप्रवास किंवा एकंदरीत त्या व्यक्तीचे विचार हे आपण आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार, आपल्या समजुतीनुसार रेखाटत असतो. पण... पुन्हा प्रश्न पडतो कि एखाद्या व्यक्तीबाबतीत लिहिणं म्हणजे खरोखर त्या व्यक्तीबद्दल आहे की त्या व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून आपल्या त्या व्यक्तीबद्दल असणाऱ्या विचारांचा, मतांचा व अनुभवांचा सापळा आहे? म्हणजे आपण इतरांच्या बद्दल लिहिणं हा हि भ्रमच आहे? मग जे इतरांचे जीवनचरित्र रेखाटतात ते ज्यांचे जीवनचरित्र रेखाटतात त्या व्यक्तीला १००% लागू पडते?

    ..... ..  आत्मचरित्र आणि जीवनचरित्र यांच्यातील हा फरक समजावा की साम्य समजावं?.......

  

शिवानंद  बुटाले

 

 

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments: